Satara Crime : हॅलो पोलिस, ‘मी पत्नीचा खून केलाय’

पतीने पहाटे केला फोन; पोलिसही चक्रावले : चारित्र्याचा संशय
Satara Crime News
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्‍नीचा खून केला.
Published on
Updated on

सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने गाढ झोपेत असलेल्‍या पत्‍नीच्या डोक्‍यात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राॅड डोक्‍यात मारून खून केला. या घटनेनंतर मारेकर्‍यानेच पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली आणि त्याला अटक केली.

सुनीता प्रदीप चव्‍हाण (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. पती प्रदीप हणमंत चव्‍हाण (३५, दोघे रा. मंगळवार पेठ, समर्थ मंदिर रोड, सातारा) याला अटक केली आहे. या प्रकरणी मृत सुनीता यांचा भाऊ बंडू पवार (रा. कोरेगाव) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ही घटना ३१ ऑगस्‍ट रोजी पहाटे ३ वाजता घडली. सुनीता व प्रदीप यांच्यात वारंवार वाद होत होते. त्‍यातून अनेकदा मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्‍या आहेत. प्रदीप हा ट्रक चालक आहे. त्‍यांना दोन मुली व मुलगा आहे. ३० ऑगस्‍ट रोजीही पती-पत्‍नीत वाद झाला. रात्री उशिरा मुले माडीवर व एक आज्जीकडे झोपी गेले. सुनीता झोपेत असताना संशयित प्रदीप याने रॉड काढला. पत्‍नीच्या डोक्‍यात त्‍याने वर्मी घाव टाकताच रक्‍ताच्या चिळकांड्या उडाल्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news