Satara Burglary Case| शिवडेत घरफोडी : ५ लाखांचा ऐवज लंपास

उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Burglary Case
Burglary CasePudhari Photo
Published on
Updated on

उंब्रज : शिवडे (बालाजीनगर, ता. कराड) येथे घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी २ लाख ३६ हजार ८०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तसेच चोरट्यांनी २ लाख ७० हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी संजय गुलाबराव भोसले यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, रविवारी (दि. २८) रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

चोरट्यांनी घराच्या टेरेसवरील सिमेंटच्या दरवाजाची कडी उचकटून घरातील आईच्या बेडरूममधील टेबलचे ड्राव्हरचे लॉक तोडून ड्राव्हरमधील रोख रक्कम रुपये २ लाख ७० हजार आणि ६० हजार रुपये किमतीची ५.४६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ५० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३५ हजार रुपये किमतीच्या ३.१९० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा, ९० हजार रुपये किमतीचे ९० ग्रॅम वजनाचे चांदीचे वाळेतोडे, ८०० रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची अन्नपूर्णाची चांदीची पोकळ मूर्ती, १ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे चांदीचे निरंजन व २५ ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन जोड असे सुमारे २ लाख ३६ हजार ८०० रुपये किमतीचे सोने व चांदीचा ऐवज लंपास केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news