

लोणंद: पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ४ लाखांच्या ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. रवि भास्कर पवार (वय २८, रा. सागर कॉलनी पाथरी ता. पाथरी जि. परभणी), अतुल आदमन शिंदे (वय ३०, रा. पाडेगाव ता. खंडाळा) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद शहरातील माऊलीनगर परिसरातून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. संशयित लोणंदमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच ७ दुचाकी व घरफोडीतील साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत
सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहीत हेगडे, सहा.पो.उपनिरीक्षक विजय पिसाळ, विष्णु धुमाळ, पोलीस हवालदार नितीन भोसले, राहुल मोरे, रतनसिंह सोनवलकर, सतिश दडस, बापुराव मदने, विठठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, जयवंत यादव, संजय चव्हाण यांनी ही कारवाई केली.