Satara Crime : चोरी करणार्‍या पती-पत्‍नीला मोक्‍का

संशयित कराडचे : पोलिस अधीक्षकांचा दणका
Satara Crime : चोरी करणार्‍या पती-पत्‍नीला मोक्‍का
Published on: 
Updated on: 

सातारा : कराड परिसरामध्ये तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी, यात्रा, जत्रा, बस स्टॅन्ड, रॅली व मिरवणूका अशा ठिकाणी चोरी व जबरी चोरी या सारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणार्‍या पती-पत्‍नीवर संघटीत गुन्‍हेगारी (मोक्‍का) अंतर्गत कारवाई करण्यात आली. संशयित दाम्‍पत्‍य कराड तालुक्‍यातील असून पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गुन्‍हेगारी साफसफाई करत दणका दिला.

श्रावण राजेश कांबळे (वय ३३), पूनम श्रावण कांबळे (वय २७, दोघे रा.मलकापूर, कराड) असे दाम्‍पत्‍याचे नाव आहे. संशयित टोळीविरुध्द पोलिस ठाण्यात गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. गुन्‍हे दाखल झाल्‍यानंतर पोलिसानी त्‍यांना अटक करुन त्‍यांच्यावर प्रतिबंधात्‍मक कारवाई केली. मात्र संशयितांमध्ये सुधारणा होत नव्‍हती. आर्थिक व इतर फायदा मिळवण्याच्या उद्देशाने ते कराड शहर परिसरात चोर्‍या करत होते. यामुळे कराड शहरचे पोनि दत्तात्रय दराडे यांनी दोघांचा मोक्‍काचा प्रस्‍ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षक कार्यालय वे तेथून पुढे वरिष्ठ कार्यालयात पाठवला.

एसपी निखील पिंगळे जिल्‍ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केले आहे. सराईत गुन्हेगार, टोळीची दहशत करुन वर्चस्व निर्माण करुन आर्थिक व इतर फायदयाकरीता संघटीतपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी करावाई केली. सातारा जिल्हयातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, छोटे मोठे व्यवसाईक यांच्यामध्ये निर्भय व सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे. तसेच सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, संघटितपणे गुन्हे करणारे आरोपी गुन्हेगारींची वाढती दहशत मोडीस काढून सामान्य जनतेच्या मनातील भीती नष्ट करण्यासाठी, सामान्य नागरिकांचे जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सातारा जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे.

एसपी निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवाएसपी राजश्री पाटील, पोनि विश्वजीत घोडके, पोनि दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गोडसे, पोलिस शैला पवार, अमित सपकाळ आसिफ जमादार, वसीम सेंदे, आनंदा जाधव, धिरज कोरडे, निलेश विभुते, सोनाली पिसाळ यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news