Satara Crime: आदर्की खुर्द येथे रानडुकराच्या शिकारीप्रकरणी चौघांना अटक

संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवसाची वनकोठडी
Satara Crime: आदर्की खुर्द येथे रानडुकराच्या शिकारीप्रकरणी चौघांना अटक
Published on
Updated on

साखरवाडी : आदर्की खुर्द येथे रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने चौघांना अटक केली. संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.

वन विभागाला ३० जुलै रोजी रात्री आदर्की खुर्द परिसरात रानडुकराची शिकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली. याप्रकरणी वनरक्षक, आदर्की यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील संशयितांमध्ये सोमनाथ बाळू भंडलकर (५०), अतुल रमेश जाधव (२०), विक्रम संतोष डोंबाळे (२४) आणि गणेश लक्ष्मण जाधव (२५, सर्व रा. आदर्की खुर्द, ता. फलटण) यांचा समावेश आहे.

दि. ३१ जुलै रोजी न्यायालयाने चौघांना एक दिवसाची वनकोठडी सुनावली. कारवाईदरम्यान संशयितांकडून तीन मोबाईल फोन आणि एमएच-११-बीयू-४५८५ क्रमांकाची टीव्हीएस मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली . तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news