Satara Crime: पूर्ववैमनस्यातून दोघांना चिरडण्याचा प्रयत्न

आगाशिवनगर येथील प्रकार
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

कराड : आगाशिवनगर येथील देवकर कॉलनी परिसरात जुन्या वैमनस्यातून स्कॉर्पिओ वाहन अंगावर घालून दोन युवकांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

देवकर कॉलनी परिसरात काही युवकांमध्ये वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी अक्षय संजय मोकाशी (वय ३२, रा. आगाशिवनगर) तेथे गेले होते. त्यानंतर सर्वजण घरी जाण्याच्या तयारीत असताना काळ्या रंगाची स्कॉर्पिओ घटनास्थळी आली. फिर्यादीनुसार, संशयित रोहित अर्जुन पोळ याने जुने वैमनस्य आणि रोहित लाखे याच्याशी असलेल्या वादाच्या कारणावरून वाहनाचा वेग वाढवत स्कॉर्पिओ अक्षय मोकाशी व रोहित लाखे यांच्या अंगावर घातली.

या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अक्षय मोकाशी यांच्या खांदा, हात, गुडघे व चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन्ही गटांतील जुने वाद आणि पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष पुन्हा उफाळल्याची चर्चा परिसरात सुरू असून कराड शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news