Satara Congress: काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी नामदेव पाटील

सहा महिन्यांपूर्वीच कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती झाली होती
नामदेव पाटील
नामदेव पाटील Pudhari
Published on: 
Updated on: 

कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय नामदेव पाटील यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणुगोपाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

सहा महिन्यांपूर्वीच कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पाटील यांची नियुक्ती झाली होती. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ताकद दाखवत पाटील यांनी पत्नी सुनंदा पाटील यांना विजयी करून लक्ष वेधले होते. कराड पंचायत समितीच्या वारूंजी गणात रवींद्र बडेकर यांना विजयी करून या विभागावरील वर्चस्व सिद्ध केले. गेल्या महिन्यात पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांनी जिल्हाध्यक्ष निवडीबाबत जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांचे मत जाणून घेतले होते. त्यावेळीही जिल्हाध्यक्षपदी पाटील यांच्या नावाला पसंती दिली होती. सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राजकारण, समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या 53 वर्षीय पाटील यांनी वारुंजी गावचे सरपंच, कराड पंचायत समितीचे सदस्य, वीट भट्टी संघटनेचे तालुकाध्यक्ष यासह विविध पदांवर प्रभावी काम केले. काँग्रेसचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी अल्पावधीत केलेले काम प्रभावी ठरले आहे. जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर होताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news