

सातारा : साताऱ्यातील काँग्रेस भवन बाहेर असलेल्या टपऱ्यांना गुरुवारी पहाटे आग लागली. या दुर्घटनेत सुमारे 4 ते 5 टपऱ्या जळून खाक झाल्या. यामध्ये व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, काँग्रेस भवन बाहेर अनेक व्यावसायिकांच्या टपऱ्या आहेत. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा धुराचे लोट व काही क्षणात आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुमारे अर्ध्या तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आगीमध्ये व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.