Satara News : सातारकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार

चार दिवसांत अंमलबजावणी : नगरपालिकेकडून झोननिहाय वेळापत्रक
 water shortage
water shortagepudhari photo
Published on: 
Updated on: 

सातारा : जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून या निर्णयाची अंमलबजावणी १६ रोजीपासून होणार आहे. सातारा पालिकेकडून चारच दिवसांत पाणी कपातीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी वितरण व्यवस्थेचे झोननिहाय वेळापत्रक तयार होत आहे.

सातारा शहरास कास धरण आणि उरमोडी उपसा योजनेतून पाणीपुरवठा होतो. याशिवाय जीवन प्राधिकरणाकडून कण्हेर आणि कृष्णा उद्‌भव योजनेतून उपनगरांना पाणी दिले जाते. या पाणीयोजनांना पुरवठा करणारी धरणे भरली असली, तरी पुढील वर्षापर्यंतची खबरदारी घेण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आतापासूनच उपाययोजनेच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. निर्देशानुसार सातारा पालिकेनेही पाणी वितरण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी अवघ्या चार दिवसांत होणार आहे. त्यामुळे सातार्‍यातील नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार कोसळणार आहे.

विशेष म्हणजे ही कपात तात्पुरती नसून ऑगस्ट २०२७ पर्यंत लागू राहणार असल्याने सातारकरांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर्षी पाऊसमान कमी झाल्याने पाणीसाठे धोक्यात आले आहेत. त्यामुळे पाणीकपात करणे अपरिहार्य आहे. पालिकेकडून होणारी पाणीकपात काही दिवसांपुरती नसून ती पुढील १० महिन्यांहून अधिक काळ राहणार आहे. त्यामुळे सातार्‍यात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची झळ तीव्रतेने जाणवणार आहे. सध्याच शहरात पाणीपुरवठ्याबाबत अनेक तक्रारी असताना १० टक्के अतिरिक्त कपात म्हणजे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news