

सातारा : सातार्यातील मिरची व्यवसायिकला कर्नाटक राज्यातील व्यापाराने १९ लाख ९३ हजार रुपयांना फसवले.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ए.के.कुंडगोल दुकानाचे मालक शोएब कुंडगोल (रा. हवेरी, रा. कर्नाटक) याच्या विरुध्द संतोष सुरेशलाल सारडा (वय ४७, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना नोव्हेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडली आहे. ४०० पोती बेडगी, कशिमरी बेडगी, संकेश्वरी मिरचीची तक्रारदार यांनी मागणी करुन संशयिताला त्यानुसार बँक खात्यातून पैसे पाठवले होते. मात्र, संशयिताने मिरची न पाठवता उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याने अखेर तक्रारदार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.