Satara Crime: सातार्‍यात चेन स्‍नॅचिंगचे 'ओपन चॅलेंज', सलग ३ घटनांनी खळबळ

पोलिस गस्‍तीचा उडाला बोजवारा
chain snatching
chain snatchingPudhari
Published on
Updated on
विठ्ठल हेंद्रे

सातारा : सातारा शहरात एकाच आठवड्यात ३ चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्‍याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दुकानात बसलेल्‍या महिलेच्या गळ्यातील, दळण आणण्यासाठी आणि किराणा खरेदीसाठी निघालेल्‍या महिलांना लक्ष्य करत डाव साधला गेला आहे. यामुळे पोलिस गस्‍तीचा बोजवारा उडाला असून चेन स्‍नॅचरनी पोलिसांना जणू उघड आव्‍हान (ओपन चॅलेंज) दिल्‍याचे चित्र निर्माण झाले आहे.

शाहूपुरी व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केसरकर पेठ, कूपर कॉलनी, बारटक्‍के चौक येथे चेन स्‍नॅचिंगच्या घटना घडल्‍या आहेत. एक दिवसाच्या अंतराने या सर्व चोर्‍या झाल्‍या आहेत. जर एका आठवड्यात तीन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या असतील, तर हा प्रकार गंभीर मानला जात असून पोलिसांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सातार्‍यात २३, २५ आणि २७ जुलै रोजी चेन स्‍नॅचिंगच्या घटना घडल्‍या आहेत. यामध्ये एकूण ४० ग्रॅम म्‍हणजे ४ तोळे वजनाचा सोन्‍याचा ऐवज लंपास झाला आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे याची किंमत ६ लाख रुपयांपर्यंतचे सोने चोरी झाले आहे. दरम्‍यान, दुकानात बसलेल्‍या महिलेच्या गळ्यातीलही चेन स्‍नॅचिंग झाल्‍याने चोरट्यांनी पोलिसांना आव्‍हानच दिले आहे. सातारा शहरात अशा घटना गेल्‍या काही महिन्‍यांपासून वाढू लागल्‍या आहेत. यामुळे पोलिसांनी गस्त, तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाया प्रभावी करणे आवश्यक आहे.

चेन स्‍नॅचिंग रोखण्‍यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, चेन स्नॅचिंग प्रकरणांसाठी स्वतंत्र तपास पथक नेमावे. घटनास्थळासह शहरातील सर्व प्रमुख सीसीटीव्ही फुटेज तातडीने तपासावे. शहराबाहेर जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर अचानक नाकाबंदी करावी, सराईत गुन्हेगार आणि जामिनावर असलेल्या संशयितांची पडताळणी करणे आवश्‍यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news