Satara Illegal Adoption| दत्तक घेण्यासाठी बोगस कागदपत्रे

शासनाची फसवणूक; सातार्‍यातील तिघांवर गुन्‍हा
crime news
दत्तक घेण्यासाठी बोगस कागदपत्रेFile Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : दत्तक घेण्याची कोणतीही प्रक्रिया न पार पाडता, अवघ्या १ वर्षाच्या मुलीची बोगस कागदपत्रे बनवून शासनाची फसवणूक केल्‍याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

राजेश तुळशीदास तपासे (रा. मल्‍हार पेठ), गीतांजली महादेव घाटे (रा. मोळाचा ओढा), संजीवनी महादेव घाटे (रा. सदरबझार, सर्व सातारा) यांच्यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जिल्‍हा पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या महिला फौजदार ज्योती बेनवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. ७ जुलै २०२५ ते ६ नोव्‍हेंबर २०२६ या कालावधीत घडली आहे. संशयितांनी अज्ञात पालकांच्या अवघ्या १ वर्षाच्या मुलगी असलेल्‍या बाळाची बोगस कागदपत्रे बनवली. दत्तक घेण्याची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता त्‍या मुलीचा फलटण तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीचा जन्‍माचा दाखला तयार केला. हा जन्‍माचा दाखला संशयिताने सातारा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात खरा म्‍हणून दाखवून तो दाखल केला. त्‍या आधारे रेशनिंग कार्डवर त्‍या मुलीचे नाव बेकायदेशीरपणे लावले. अशाप्रकारे शासनाची फसवणूक केली. या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्‍यानंतर बोगस कागदपत्रे झाल्‍याने पोलिसांच्या वतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.