

साखरवाडी : काळज (ता. फलटण) येथे सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने गावातीलच एकाचा कोयता व अन्य धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. नितीन तकदीर मोहिते (रा. काळज) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती. नितीन सोमवारी रात्री समाज मंदिरात बसले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी कोयता व धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर टोळक्याने धूम ठोकली. गंभीर जखमी नितीनला ग्रामस्थांनी लोणंदमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.