Satara Black Panther Sighting: भिलार परिसरात काळ्या बिबट्याचा वावर

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Satara Black Panther Sighting: भिलार परिसरात काळ्या बिबट्याचा वावर
Published on
Updated on

पाचगणी : भिलार, ता. महाबळेश्‍वर परिसरात पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचा वावर वाढल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीही परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला होता. त्यानंतर काही काळ परिस्थिती शांत होती. मात्र, आता अंजुमन परिसरातील एका घराजवळ काळ्या बिबटा आणी बिबट्याची पिलेही या परिसरात पाहिल्याने चिंता वाढली आहे.

अंजुमन ते भिलार हा रस्ता परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी तसेच कामानिमित्त ये-जा करणारे अनेक नागरिक नियमितपणे वापरत असतात. याच मार्गालगत असलेल्या शेतामध्ये काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिलार परिसर हा दाट झाडी, शेतजमिनी आणि मानवी वस्तीला लागून असल्याने वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून आढळून येतो. सध्या पावसाळी हंगामामुळे शेतीची कामे वेगाने सुरू असून अशा परिस्थितीत बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news