Satara Gutkha Seizure : गुटख्यासोबत सापडला ‘बांटा’चा साठा

संशयिताला अटक : नशेच्या गोळ्यांमुळे खळबळ
gutkha seizure
gutkha seizurePudhari Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : सातार्‍यात सोमवारी पोलिस व अन्‍न, औषध विभागाने रविवार पेठेत टाकलेल्‍या छाप्यामध्ये धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला यासोबत शेकडो बांटा गोळ्यांचा साठाही सापडल्‍याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित साहिल कोळकर याला अटक करण्यात आली असून त्‍याला दि. १९ नोव्‍हेबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

साहील इमाम कोळकर (रा.रविवार पेठ, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अन्‍न, औषध विभागाला रविवार पेठेत पान मसाला याचा साठा असल्‍याची माहिती मिळाली होती. त्‍यानुसार सातारा शहर पोलिसांच्या सहकार्याने रविवार पेठेत धाड टाकण्यात आली. पोती भरुन पान मसाला सापडला असताना त्‍याचवेळी काही गोळ्या घटनास्‍थळी होत्‍या. शेकडो गोळ्या सापडल्‍यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्‍या. त्‍याबाबत अधिक माहिती घेतली असता नशा येणारी बांटा गोळी असल्‍याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्‍त केला असता तो दीड लाख रुपयांचा आहे.

संबंधित मुद्देमाल साहील याचा असल्‍याचे तपासात समोर आल्‍यानंतर पोलिसांनी त्‍याला शोधून पकडले. अटक करुन त्‍याला मंगळवारी त्‍याला न्‍यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्‍यान, सोमवारी सातार्‍यात झालेल्‍या कारवाईनंतर बांटा गोळ्या असल्‍याचे समोर आल्‍यानंतर पान मसाला, गुटखा व बांटा गोळ्या असे दोन वेगवेळे गुन्‍हे दाखल होण्याची शक्‍यता आहे.

पान टपर्‍यांमध्ये सप्‍लाय

सातारा शहरासह उपनगरांमध्ये बांटा गोळीने गेल्‍या ३ ते ४ वर्षात धुडगूस घातला आहे. गांजापासून बनवली जाणारी छोटी गोळी नशेसाठी कमालीची प्रसिध्द आहे. अल्‍पवयीन मुले, तरुण सर्रास याचे सेवन करत आहेत. एखादे गुन्‍हेगारी कृत्‍य करण्यासाठी 'किक' म्‍हणून देखील बांटा गोळी खाणार्‍यांची फौज आहे. सातार्‍यात एखाद्या छाप्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात बांटा गोळ्या सापडण्याची पहिली कारवाई आहे. संबंधित गोळी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. दरम्‍यान, पान टपर्‍यांमध्ये या बांटा गोळ्यांचा सप्‍लाय कोण करतयं? असा सवाल उपस्‍थित झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.