Satara Crime: साताऱ्यात 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न

देशात नावाजलेल्या शाळेतील प्रकार; गुन्हा दाखल
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

सातारा : देशात नावाजलेल्या साताऱ्यातील एका शाळेत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले असून 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. वॉर्डबॉय म्हणून संशयित शाळेत काम करत असून त्याने वेळोवेळी मुलांसोबत गैरकृत्य करून मुलांना मारहाण करत धमकावले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ऋषीकेश सुभाष चव्हाण (मूळ रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, सध्या रा. सदर बाजार, सातारा) असे संशयिताचे नाव आहे. प्राथमिक माहिती अशी, अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळेतीलच प्रशासनातील पदाधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अत्याचाराच्या प्रयत्नाची घटना 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी (नक्की तारीख माहीत नाही) तसेच 7 मार्च 2026 रोजी झाली आहे. सकाळी 6.30 वाजता वॉर्डबॉय असणाऱ्या संशयिताने 3 मुलांसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुले घाबरली. मुलांनी ही बाब कोणाला सांगू नये, यासाठी संशयिताने मुलांना धमकी दिली. तसेच मुलांना मारहाण देखील केली. मारहाणीमध्ये मुलांचा हात पिरगळला, डोके आपटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व घटनेने शाळेतील मुले घाबरली.

याबाबत प्रशासनाकडे मुलांनी तक्रार केल्यानंतर घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे (पोक्सो) संशयित चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news