Satara Liquor seizure: अतित येथे विदेशी दारु जप्‍त

अतित, ता. सातारा येथे राज्य उत्‍पादन शुल्‍क विभागाने (एक्‍साईज) छापा टाकून देशी, विदेशी दारुच्या बाटल्‍या जप्‍त केल्‍या
Satara Liquor seizure: अतित येथे विदेशी दारु जप्‍त
Published on
Updated on

सातारा : अतित, ता. सातारा येथे राज्य उत्‍पादन शुल्‍क विभागाने (एक्‍साईज) छापा टाकून देशी, विदेशी दारुच्या बाटल्‍या जप्‍त केल्‍या. दुचाकीवरुन वाहतूक होत असताना ही कारवाई करुन दोघांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला.

प्रकाश काशिनाथ सुतार (वय २४), सुरज संतोष यादव (वय २७ दोघे रा. अतीत ता. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, समर्थगाव अतित येथे विदेशी दारु विक्री होत असल्‍याची माहिती एक्‍साईज विभागाला मिळाली. त्‍यानुसार पथक तयार घटनास्‍थळी छापा टाकण्यात आला. यावेळी संशयिताकडे देशी, विदेशी दारुच्या ३६,१८० रुपये किंमतीच्या १८६ बाटल्‍या होत्‍या. एक्‍साईज विभागाच्या पथकाने त्‍या बाटल्‍या जप्‍त केल्‍या.

एक्‍साईजचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, विजय मरोड, बाळासो पाचुंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्‍यान, जिल्ह्यामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news