Satara Fire: सातार्‍यात आगमन मिरवणुकीला गालबोट

फटाक्‍यांमुळे ड्रॅगनचा भडका; आयोजकावर गुन्‍हा
Satara Fire
Satara Fire
Published on
Updated on

सातारा : सातार्‍यात आगमन मिरवणुकीला उत्‍साहात सुरुवात झाली असताना राजवाड्यावर मंगळवारी रात्री फटाके उडवल्‍यानंतर मनोरंजनासाठी तयार केलेल्‍या ड्रॅगनला भीषण आग लागली. यामुळे गालबोट लागले असून शाहूपुरी पोलिस ठाण्यात मंडळाच्‍या आयोजकावर गुन्‍हा दाखल झाला. नितीन प्रमोद भोसले (रा. शाहूपुरी) याच्यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अमोल साळुंखे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली .

मंगळवारी रात्री राजवाडा परिसरातून सह्याद्री गणेशोत्‍सव मंडळाची आगमन मिरवणूक निघाली होती. या मंडळाने ट्रॅक्‍टर ट्रॉलीमध्ये कापडी, कागदी ड्रॅगनची मोठी प्रतिकृती देखावा म्‍हणून मनोरंजनासाठी तयार केली होती. यावेळी ड्रॅगन पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली होती. आगमन मिरवणूक राजवाडा परिसरात आल्‍यानंतर फटाक्‍यांची आतषबाजी झाली. फटाक्‍यांची आतषबाजी करत असताना नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी परिस्‍थिती होती.

याच दरम्‍यान ट्रॅक्‍टरमधील ड्रॅगनला भीषण आग लागली. ड्रॅगन कापडी कागदाचा असल्‍याने अवघ्या काही क्षणात त्‍याने पेट घेतला. ड्रॅगन व जनरेटर दोन्‍ही पेटले व पाहता पाहता धूर व जाळ निघाला.

सुदैवाने दुर्घटना टळली

राजवाडा परिसरातील चौकात ही घटना घडली. चारही बाजूला रस्‍ते फुटले आहेत. ही दुर्घटना घडल्‍यानंतर ट्रॅक्‍टर ट्रॉलीजवळ असलेल्‍या नागरिकांची पळताभुई थोडी झाली. सुदैवाने या घटनेत इतर कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news