Anjana Kumbhar Satara News| गणपती घडवणाऱ्या हातांचा होणार गौरव; साताऱ्यातील अंजनाताईंना राष्ट्रपतींचे निमंत्रण

Anjana Kumbhar Satara News |स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपतीभवनात विशेष कार्यक्रम; टपाल अधिकाऱ्यांनी घरी जाऊन दिली पत्रिका
Anjana Kumbhar Satara
Anjana Kumbhar SataraCanva
Published on
Updated on

Anjana Kumbhar Satara News

सातारा: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मातीतून कलाकृती घडवणाऱ्या साताऱ्याच्या एका लेकीला थेट देशाच्या राजधानीतून मानाचे बोलावणे आले आहे. परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन ही निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली, तेव्हा त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाल्याची भावना कुंभार कुटुंबाच्या चेहऱ्यावर होती.

Anjana Kumbhar Satara
Ratnagiri Raja 2025 | रत्नागिरीच्या राजाचं दणक्यात आगमन; ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, मंत्री उदय सामंतही सोहळ्यात सहभागी!

'उमेद'ने दिली भरारी

सौ. अंजना कुंभार यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पारंपरिक कुंभार व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या 'उमेद' अभियानांतर्गत मार्गदर्शन मिळाले. महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी 'लखपती दीदी' या योजनेतून आपल्या महिला बचत गटासाठी कर्ज घेतले. या भांडवलाच्या जोरावर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायाचा केवळ विस्तारच केला नाही, तर त्याला नवी ओळख दिली.

  • उत्पादने: मातीच्या सुबक वस्तू, पारंपरिक गणेश मूर्ती, मातीची भांडी आणि खेळणी.

  • बाजारपेठ: आपल्या गावापुरता मर्यादित न राहता त्यांनी पुणे, मुंबई, पाटण, सातारा अशा विविध ठिकाणी आपली कलाकुसर पोहोचवली आणि स्वतःची बाजारपेठ निर्माण केली.

त्यांच्या या कार्याची दखल 'उमेद' संस्थेने घेतली आणि त्यांच्या यशोगाथेला प्रसिद्धी दिली.

Anjana Kumbhar Satara
Ratnagiri : धरणालगतचा निसर्ग पाहता पर्यटन विकासाची गरज!

कार्याची दखल थेट दिल्लीत

गावापासून सुरू झालेला हा प्रवास राज्यभर पोहोचला आणि त्यांच्या या कार्याची दखल थेट दिल्लीतील सर्वोच्च कार्यालयांनी घेतली. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अंजना कुंभार यांची ही प्रेरणादायी कहाणी पोहोचली. याच उत्तुंग कामगिरीमुळे त्यांना १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आणि राष्ट्रपती भवनातील स्वागत समारंभासाठी 'विशेष निमंत्रित' म्हणून बोलावण्यात आले आहे. जिल्ह्यातून हा मान मिळवणाऱ्या त्या एकमेव नवउद्योजिका आहेत.

सन्मानाची पत्रिका दारी

राष्ट्रपती सचिवालय, नवी दिल्ली येथून आलेली ही विशेष निमंत्रण पत्रिका अंजना कुंभार यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टपाल विभागानेही विशेष आपुलकी दाखवली. प्रवर अधीक्षक (डाकघर) रत्नाकर टोपारे, उपाधीक्षक मयुरेश कोले, सहाय्यक अधीक्षक संदीप घोडके आणि परळीचे डाक अधिकारी यांनी स्वतः परळी येथील त्यांच्या घरी जाऊन ही पत्रिका सुपूर्द केली.

एका महिलेच्या कर्तृत्वाला देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींकडून मिळालेली ही दाद म्हणजे महिला सक्षमीकरणाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. एका महिला उद्योजिकेला महिला राष्ट्रपतींनी स्वातंत्र्य दिनासाठी आमंत्रित करणे, हा केवळ अंजना कुंभार यांचा वैयक्तिक सन्मान नसून, देशातील प्रत्येक संघर्ष करणाऱ्या आणि स्वप्न पाहणाऱ्या महिलेचा गौरव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news