Satara Traffic: आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

सलग सुट्ट्या संपल्याने महामार्गावर ताण; प्रवासी, चालक त्रस्त
Traffic
Traffic
Published on
Updated on

सातारा : ईद, रक्षाबंधन तसेच शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्या संपल्यामुळे गावी आलेल्या नोकरदार, विद्यार्थी आणि चाकरमान्यांनी रविवारी पुणे-मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केल्याने महामार्गावर दिवसभर वाहनांची गर्दी झाली. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. आनेवाडी टोलनाक्यावर तर वाहनांच्या रांगांनी मोठे स्वरूप धारण केले होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागले.

जिल्ह्यासह परिसरातील अनेक नागरिक कुटुंबीयांसह गावी आले होते. सुट्ट्या संपत असल्याने सकाळपासूनच पुणे, मुंबई तसेच अन्य शहरांकडे परतीचा प्रवास सुरू झाला. परिणामी, सातारा-पुणे महामार्गावर वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत वाढली.

वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान

सलग सुट्ट्यांनंतर मोठ्या प्रमाणावर वाहने परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन पोलिस आणि महामार्ग यंत्रणेसाठी आव्हान ठरले. महत्त्वाचे चौक आणि टोलनाक्यांच्या परिसरात वाहतुकीवर लक्ष ठेवून कोंडी होऊ न देणे आवश्यक बनले होते. अचानक वाहनांचा ओघ वाढल्यास कोंडीची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news