Satara News : सातार्‍यात आज ‘हवाई प्रात्‍यक्षिकांचा थरार’

सैनिक स्कूलच्या ३० किलोमीटर परिसरात ड्रोन बंदी : ९ विमाने झेपावणार
Satara News : सातार्‍यात आज ‘हवाई प्रात्‍यक्षिकांचा थरार’
Published on: 
Updated on: 

सातारा : सैनिक स्कूल सातारा येथे भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्य किरण ॲरोबॅटिक टीम’च्या ९ विमानांचे सोमवारी विशेष हवाई थरारक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. सातार्‍यातील विमानांच्या या उड्डाण सुरक्षेला आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सैनिक स्कूलपासून ३० किलोमीटर त्रिज्येत ड्रोनसह इतर संपूर्ण हवाई क्षेत्र ‘रेड झोन’ अर्थात ‘नो ड्रोन झोन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत सराव प्रात्यक्षिक तसेच दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मुख्य हवाई प्रात्यक्षिक होणार आहे. यामुळे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ आणि २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत सैनिक स्कूल सातारा केंद्रबिंदू मानून ३० किलोमीटर परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या क्षेत्रात खासगी व व्यावसायिक ड्रोन, मानवरहित हवाई वाहने, रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स, मायक्रोलाइट विमाने, हॉट एअर बलून तसेच कमी उंचीवर उडणाऱ्या अन्य वस्तूंच्या उड्डाणास मनाई असेल. हा आदेश भारतीय हवाई दल आणि पोलीस विभागाच्या अधिकृत कामकाजास लागू राहणार नाही.

हवाई प्रात्यक्षिके जमिनीपासून एक हजार फुटांपेक्षा कमी

उंचीवर होणार असल्याने अनधिकृत ड्रोन किंवा अन्य वस्तूंमुळे विमानांच्या उड्डाणाला तसेच प्रेक्षकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे याबाबतचे नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.