

नागठाणे : पुणे-बंगळूर महामार्गांवर बोरगाव ता. सातारच्या हद्दीत लग्नासाठी निघालेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या अपघातामध्ये पाचजण जखमी झाले. याप्रकरणी बसचालक सतीश वसंत सोट (रा. तरडगाव, पो. निंबोडी ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून-बेळगावकडे लग्नासाठी ट्रॅव्हल्स निघाली होती. बोरगाव जवळ आल्यावर सकाळी 10 च्या सुमारास सातारा-कराड लेन वर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी पलटी झाली. या गाडीत 18 प्रवासी होते. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये काही प्रवासी अडकले होते. स्थानिक ग्रामस्थ्यांच्या मदतीने पोलिसांनी अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले होते. ॲम्ब्युलन्सच्या मदतीने जखमी प्रवाशांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या बसचा चालक घटनास्थळवरून पळून गेला. या अपघाताची नोद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.