Satara Accident: दुचाकीच्या धडकेत सुळेवाडीतील एक जण ठार

जेवण करून पायी चालत जात असताना पाठीमागून मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने डोक्यास मार लागून एकजण ठार झाला
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

मारूल हवेली : जेवण करून पायी चालत जात असताना पाठीमागून मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने डोक्यास मार लागून एकजण ठार झाला. सुळेवाडी (ता.पाटण) येथे ही घटना घडली. घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. कृष्णत शेजवळ (वय 51, रा.सुळेवाडी, ता.पाटण) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ भाऊ वरेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुक्रवार दि.3 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास जेवण करून गावातील मित्र धनाजी शेजवळ, कृष्णत शेजवळ व विलास शेजवळ हे गव्हाणवाडी फाटा ते मोरगिरी जाणाऱ्या रस्त्यावर सुळेवाडी येथून नाईकबा मंदिर या ठिकाणी पायी चालत जात होते. सुळेवाडी गावचे हद्दीतील वाघाळीचा पूल येथे फिर्यादी रघुनाथ वरेकर व कृष्णत शेजवळ हे चालत असताना कृष्णत शेजवळ यांना मोरगिरी बाजूकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरसायकलने पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात कृष्णत शेजवळ याच्या डोक्याला मार लागून ते बेशुद्ध झाले. त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. अपघात प्रकरणी दुचाकी चालक कृष्णत हरिबा लोंढे (वय 27, रा.रेवलकरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार लेंबे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news