Satara Accident: काशीळ येथे शिवशाहीच्या धडकेत पादचारी ठार

रात्री रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला शिवशाहीची जोराची धडक बसली
Accident
Accident
Published on
Updated on

वेणेगाव : सातारा-कराड आशियाई महामार्गावरील काशीळ (ता. सातारा) येथील ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी रात्री रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला शिवशाहीची जोराची धडक बसली. या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. सुधीर सदाशिव जाधव (वय ३९, रा. काशीळ) असे अपघातात ठार झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास जाधव ग्रामीण रुग्णालयासमोरील रस्ता ओलांडत होते. दरम्‍यान साताऱ्याकडून कराडच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस (क्र. एमएच ०६, बी डब्ल्यू ३७२५) ने सुधीर जाधव यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत जाधव यांच्‍या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. ते रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडले होते.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्‍थळी धाव घेत तत्काळ मदत कार्य राबविले. जाधव यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मात्र उपचारासाठी नेण्यापूर्वीच जाधव यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शिवशाही बसचे चालक नितीन उद्धव मोरे (मूळ रा. चायगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा; सध्या हरिपूर रोड, सांगली) यांच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद शिवानंद रामचंद्र जाधव यांनी दिली असून तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक कारळे तसेच अपघात विभागाचे पोलीस हवालदार अमोल गवळी आणि संजय जाधव करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news