Satara Accident: बसच्या धडकेत कणसेवाडीचा युवक ठार

खटाव तालुक्यातील कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर दुचाकीस्वारास एस.टी. बसने धडक दिल्याने युवक ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली
Accident
Accident
Published on
Updated on

वडूज : खटाव तालुक्यातील कातरखटाव-एनकुळ रस्त्यावर दुचाकीस्वारास एस.टी. बसने धडक दिल्याने युवक ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. महेश बाबासो मदने (वय ३५, रा. कणसेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी तुळशीराम दादासो रणसिंग (रा. वडूज) या एस.टी. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, कातरखटाव ते एनकुळ जाणारे रोडच्याकडेला डावे बाजूस सोलर प्लॅटच्या गेटसमोर महेश मदने हा दुचाकीवरून (क्रमांक एम.एच. ४३ डब्ल्यू १६०८) घरी येत होता. दरम्यान, एनकुळ बाजूकडून कातरखटाव बाजूकडे येणारी खातवळ ते वडूज एस.टी. बस (क्र. एम.एच. १४ एनई ५२८७) वरील चालक तुळशीराम रणसिंग याने त्याचे ताब्यातील एस.टी. बस भरधाव वेगात चालवून महेश मदने याच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत महेश मदने ठार झाला. याप्रकरणी मयताचा चुलतभाऊ सुनील बबन मदने यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोनि घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस नाईक पी. एल. जगदाळे तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news