Satara Accident: व्याहळी कॉलनीजवळ अपघातात चालक ठार

व्‍याहळी कॉलनी, ता. वाई गावच्‍या हद्दीत जोर-वाई मार्गावरील काळुबाई मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात वाहन चालक ठार झाला
Accident
Accident
Published on
Updated on

वाई : व्‍याहळी कॉलनी, ता. वाई गावच्‍या हद्दीत जोर-वाई मार्गावरील काळुबाई मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात वाहन चालक ठार झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्‍यात झाली आहे.

अभिजीत श्रीनाद यादव असे ठार झालेल्‍या चालकाचे नाव आहे. तर चित्रा आनंदा फरांदे असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, एक चार चाकी वाहन जोरहून वाईकडे येत होते. शुक्रवारी पहाटे ३.३२ च्‍या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या दक्षिण बाजूच्या चरात जाऊन आदळली. या अपघातात वाहन पलटी झाले.

अपघाताचा मोठा आवाज झाल्‍याने स्‍थानिकांनी घटनास्‍थळी धाव घेतली. यानंतर स्‍थानिकांनी वाहनात अडकलेल्या महिलेला बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले. तर यावेळी वाहनाखाली अडकून चालक ठार झाला. घटनास्थळाच्या पंचनाम्यात अपघातस्थळापूर्वी सुमारे ५० मीटरपर्यंत ब्रेकचे ठसे आढळून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news