Satara Accident News |उज्जैनला जाणार्‍या भाविकांवर काळाचा घाला

सालपेजवळ अपघातात 2 जागीच ठार; 8 जण जखमी
Accident News |
उज्जैनला जाणार्‍या भाविकांवर काळाचा घालाFile Photo
Published on
Updated on

लोणंद : इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथून उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भाविकांना घेवून निघालेली मिनी ट्रॅव्हल्स व ट्रक यांचा सातारा-लोणंद रस्त्यावरील सालपे येथे भीषण अपघात झाला. त्यामध्ये 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण जखमी झाले. रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला.

ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24 रा. गणेश नगर शिरढोण ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) व रजनी संजय दुर्गुळे (48, रा. पेठ वडगाव, ता. हातकलंगले) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मयुरी महेश बोनगे (20, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी मयुरी बोनगे व त्यांच्या नातेवाईकांना उज्जैन, मध्यप्रदेश येथे देवदर्शनासाठी जायचे होते. यासाठी त्यांनी ओंकार पाटील यांच्या मालकीची मिनी ट्रॅव्हल्स ठरवली. शनिवार दि. 10 रोजी रात्री 10 च्या सुमारास मयुरी बोनगे यांच्यासह शशिकला बोनगे, दिपाली बोनगे, शारदा बोनगे, ईश्वरी बोनगे, शिला बोनगे, ईच्छा बोनगे, प्रथमेश बोनगे, ध्रुवकुमार बोनगे, मंगल सुतार, वासंती सवाईराम, (सर्व रा. इचलकरंजी), वैशाली दुर्गुळे, रजनी दुर्गुळे (पेठ वडगाव, ता. हातकणंगले), ज्योती मुदगल (रा. कोडोली, ता. पन्हाळा), योगिता मुदगल (वरणगे, ता. करवीर) असे सर्वजण टॅ्रव्हल्समधून निघाले.

ही बस रविवारी पहाटे वाठार स्टेशनवरुन पुढे सालपे घाटातून खाली उतरली. लोणंदनजीक असणार्‍या सालपे, ता. फलटण गावच्या हद्दीत बस आली असता समोरून भरधाव वेगात येणार्‍या ट्रकशी (क्रं.एम. एच. 42. बीएफ 784) मिनीबसची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये ट्रॅव्हल्सच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला.

रात्रीच्या काळोखात अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर भेदरुन गेला. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांनाही याची माहिती दिली. पोलिस व ग्रामस्थांनी मदत कार्य राबवत ट्रॅव्हल्समधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलवले. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news