

सातारा : सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी सातारा शहर व दहिवडी येथे लाचप्रकरणी दोघांवर कारवाई केली. दोन स्वतंत्र कारवाया झाल्याने लाचखोरांना ‘शॉक’ बसला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
राहुल आनंदराव महालिंगे (वय 45, रा. कोळकी, ता. फलटण) हा लायनमन असून, त्याने व्यावसायिक विद्युत कनेक्शन जोडण्याकरिता 5 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारली. ही कारवाई दहिवडी येथे झाली आहे. दुसरी कारवाई साताऱ्यात झाली असून त्यामध्ये प्रदीप सर्जेराव सावंत (वय 40, रा. सावंतवाडी, पोस्ट अंबवडे बु॥, ता. सातारा) हा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कार्यालयातील लिपिक सापडला आहे. त्याने तक्रारदार यांच्याकडून शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी 1500 रुपयांची लाच स्वीकारली.
गुरुवारी दिवसभरात सातारा एसीबीने कारवाया केल्या आहेत. पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुनील पाटील, पोलिस सुप्रिया गावडे, प्रशांत नलावडे, नीलेश चव्हाण, नीलेश राजपुरे, गणेश ताटे, नवनाथ शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.