सातारा : मुंबईला लहानपणी जगण्याचे हाल होत होते. अशात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका योजनेची वाट धरली. कष्ट करत शिक्षण पूर्ण केले. सातार्यामुळेच मी घडलो असून हीच आम्हा कमवा व शिका योजनेतील विद्यार्थांची पंढरी असल्याचे सांगत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी आपले अनेक पैलू उलगडले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी कमवा व शिका योजनेतील आजी-माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, उपप्राचार्य डॉ.रामराजे माने-देशमुख तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, लहानपणी जगण्याची भ्रांत असतानाच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिकाची दिशा मिळाली आणि सातार्यात 1972 साली पोहचलो. इथे अफाट कष्ट केले. खस्ता खात खात शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला शिक्षक म्हणून सेवा केली. मात्र नंतर उद्योगाची वाट धरली. आज रामशेठ ठाकूर हे नाव केवळ आणि केवळ सातारच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमुळे मोठे झाले असल्याचे ते म्हणाले. यावेळी या योजनेच्या माजी विद्यार्थ्यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना मानपत्र देवून सत्कार केला. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.