Ladki Bahin Yojana : जिल्ह्यातील 85 हजार लाडक्या बहिणींना दिलासा

ई-केवायसीतील चुका दुरुस्तीची संधी : स्थानिक पातळीवर पडताळणी
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana(file photo)
Published on
Updated on

सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने केलेल्या पडताळणीत जिल्ह्यातील 85 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. मात्र शासनाने ई-केवायसीतील चुका दुरुस्तीसाठी पुन्हा संधी दिली असून स्थानिक पातळीवर पडताळणीही केली जाणार आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा जिल्ह्यातील सुमारे सात लाख महिला लाभार्थी आहेत. सुरुवातीला सरसकट लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींची टप्प्या-टप्प्याने पडताळणी करत चाळणी लावण्यात आली. त्यामुळे अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या. या छाननीनंतर पात्र ठरलेल्या मागील दीड वर्ष लाभ घेणाऱ्या या लाभार्थ्यांची पुन्हा डिसेंबर अखेर ई-केवायसी करण्यात आली. ई केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती भरली. त्यामुळे पात्र असतानाही जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधून सुमारे 85 हजार महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ बंद होणार असल्याने या लाडक्या बहिणींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

पात्र असतानाही ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याने अपात्र ठरलेल्या या महिलांना चुकीची दुरुस्ती करण्यासाठी राज्यशासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने ई-केवायसी करण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदवाढ दिली आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुकानिहाय अपात्र लाडक्या बहिणींची यादी पाठवण्यात आली असून स्थानिक पातळीवर पडताळणी करुन चुकांची दुरुस्ती केली जाणार आहे. ई-केवायसीची पुन्हा संधी मिळाल्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news