Satara Fraud Case: पुष्ठा मशिनरीसाठी ७ कोटींची फसवणूक

संशयित पंजाबचे तिघेजण; सातार्‍यात गुन्‍हा
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

सातारा : पुष्ठा तयार करण्याची चांगली मशिनरी देतो, असे सांगून ६ कोटी ३५ लाख ७ हजार ६०० रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी पंजाबमधील तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला. पैसे घेऊन खराब मशिन दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

मुक्‍तारसिंग थिंड, अमरदीपसिंग ऊर्फ दीपू मुक्‍तारसिंग थिंड, अविनाश ऊर्फ आशू मुक्‍तारसिंग थिंड (सर्व रा. अमृतसर, पंजाब) यांच्या विरुद्ध महिलेने तक्रार दिली. फसवणुकीची घटना २०२३ पासून वेळोवेळी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍यातील तक्रारदार महिला या व्‍यवसायिक आहेत. पुष्ठा बनवण्यासाठी त्‍यांना मशिनरी लागणार होत्‍या. संबंधित मशिनरीसाठी एमएस सीनिअर मशिनरी मॅन्‍युफॅक्‍चरिंग या कंपनीसोबत संपर्क केला. कंपनीसोबत चर्चा झाल्‍यानंतर पुष्ठा तयार करण्याच्या कंपनीमध्ये कच्‍चा माल तयार करण्यासाठी लागणार्‍या चांगल्‍या मशिनरी देण्याचे ठरले.

एकूण २६ मशिनरी घेण्याचे ठरल्‍यानंतर तक्रारदार यांनी संशयितांना आरटीजीएसद्वारे ६ कोटी ३५ लाखांची रक्‍कम पाठवली. मात्र, मशिन आल्‍यानंतर त्‍या खराब होत्‍या. त्‍याबाबत वेळोवेळी तक्रारदार यांनी तक्रार केली. मात्र, संशयितांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पैसे घेऊन नव्‍या मशिन न देता फसवणूक झाल्‍याने तक्रारदार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news