Satara Water Crisis: जिल्ह्यातील 372 गावांच्या घशाला कोरड

सव्वा लाख नागरिक व 67 हजार जनावरांची तहान 78 टँकरवर
Satara Water Crisis: जिल्ह्यातील 372 गावांच्या घशाला कोरड
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यात पावसाळा तोंडावर आला तरी टंचाईच्या झळा काही कमी झालेल्या नाहीत. जिल्ह्यात 89 गावे व 283 वाड्या वस्त्यामधील 1 लाख 14 हजार 348 नागरिक व 67 हजार 435 जनावरांची तहान 78 टँकरवर भागवली जात आहे. दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी गावोगावी नागरिकांची भटकंती सुरूच असल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारीपासून सातारा जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. त्यातच नदी, नाले,तलाव, धरणे, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात उन्हाळी पावसाच्या सरी कोसळल्या तरी तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग कायम आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे.

माण तालुक्यातील बिजवडी, पाचवड, पांगरी, येळेवाडी, मोगराळे, वडगाव, जाधववाडी, राजवडी, तोंडले, अनभुलेवाडी, थदाळे, मोही,दानवलेवाडी, हस्तनपूर, डंगिरेवाडी, वावरहिरे, संभूखेड, कारखेल, वरकुटे म्हसवड, पर्यंती, धूळदेव यासह 44 गावे व 160 वाड्या वस्त्यामधील 60 हजार 181 नागरिक व 47 हजार 807 जनावरांना 38 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यातील एनकूळ, दातेवाडी, यलमरवाडी, खातवळ, कणसेवाडी, मांडवे, जायगाव, अंभेरी, कोकराळे, कामथी, कातळगेवाडी, रणसिंगवाडी, जाखणगाव, गारवडी, मोळ, मांजरवाडी, रणसिंगवाडी, शिंदेवाडी, चिंचणी, सूर्याचीवाडी अशा 20 गावे व 8 वाड्यामधील 22 हजार 697 नागरिक व 2 हजार 669 जनावरांना 11 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

वाई तालुक्यातील गुंडेवाडी, मांढरदेव, बालेघर, आनंदपूर, लगडवाडी अशा 5 गावे व 7 वाड्यामधील 4 हजागर 786 नागरिक व 2 हजार 621 जनावरांना 6 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, कोळेकरवाडी, भोसगाव, शिद्रूकवाडी, फडतरवाडी, धडामवाडी अशा 8 वाड्यामधील 2 हजार 389 नागरिक व 1 हजार 480 जनावरांना 8 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

खंडाळा तालुक्यातील गोळेगावमधील 506 नागरिक व 188 जनावरांना एका टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले, विखळे, फडतरवाडी, चवणेश्वर, मोरबेंद, नायगाव, अनपटवाडी, सोळशी, पिंपोडे बु., रणदुल्लाबाद, अंबवडे सं वाघोली, गुजरवाडी. हासेवाडी, नागेवाडी, बोधेवाडी, चोलेवाडी, शेल्टी, भंडारमाची यासह 18 गावातील 23 हजार 636 नागरिक व 12 हजार 670 जनावरांना 13 टॅकंरने पाणी पुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भीमनगर येथील 153 नागरिकांना एका टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news