Satara Crime: दारु, ताडीप्रकरणी ३४ जणांना अटक

सातारा, खंडाळा, फलटणमध्ये कारवाई : एक्‍साईजचा ड्राईव्‍ह
Satara Crime
Satara CrimePudhari
Published on
Updated on

सातारा : सातार्‍यासह खंडाळा, फलटण, माण व कराड येथे राज्य उत्‍पादन शुल्‍क विभागाने (एक्‍साईज) स्‍पेशल ड्राईव्‍ह राबवत हातभट्टी, ताडीच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्‍या. ४२ गुन्‍हे दाखल करुन ३४ जणांना अटक केली. २४८७८५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.

वेमुला सय्यद गौड, रमेश रामराव घेवाडे, सोमनाथ विठ्ठल मोरे, प्रकाश अनिल गोरे, अनिकेत सिध्‍दार्थ सकपाळ, नितेश जयसिंग बिरे, हरीष धर्मराज कुंभार, प्रशांत शेरु करमावत, हणमंत किसन पाटाेळे, चैतन्‍य बाळासो कराडे, रमेशचंद्र बाळासो पाटील, दशरथ रामचंद्र कमाने, विजय लक्ष्मण कुंभार, तानाजी मुरलीधर कमाने, हीरो लक्ष्मण कुंभार, सुरेंद्र राजेंद्र कुंभार, श्रीकांत किसन कदम, सोमनाथ नबन गायकवाड, विनायक शंकर पार्टे, शंकर पांडूरंग नलवडे, शिवाजी मारुती बनसोडे, लक्ष्मण अनंता माने, अविनाश जयवंत भोसले, विशाल रविंद्र वारे, दिनकर भास्‍कर ठोके, ज्‍योर्तिंलिंग रमेश घेवाडे, दिलावर पटेल, बापू रामदास पवार, सनी भारत शिंदे यांच्यासह महिलांवर गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे येथील विषारी दारूमुळे राज्यात हाहाकार माजला आहे. पुणेतील झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये अवैध हातभट्टी दारू व ताडी निर्मिती, वाहतुक व विक्री केंद्राची एक्‍साईज विभागाने झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. यासाठी दि. २९ मे २ जून असा ५ दिवसांचा स्‍पेशल ड्राईव्‍ह राबवण्यात आला. या मोहिमेसाठी ५ पथके तैनात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news