Satara Ganesh Visarjan : साताऱ्यात २६ तास मिरवणूक

जिल्ह्यात ४ हजार २४३ मंडळांच्या बाप्पांना निरोप
Satara Ganesh Visarjan : साताऱ्यात २६ तास मिरवणूक
Published on: 
Updated on: 

सातारा : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' असा जयघोष, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाचा दणदणाट, ढोल-ताशांच्या निनादात अन्‌ गुलाल व फुलांच्या उधळणीत, फटाक्यांच्या आतषबाजीत साताऱ्यासह जिल्ह्यात सार्वजनिक व घरगुती बाप्पांना निरोप दिला. साताऱ्यात डोळे दीपवणाऱ्या बीमलाईटमध्ये डीजेचा दणदणाट झालाच.

कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने शहर हादरून गेले. साताऱ्यात २६ तास सुरू असलेल्या मिरवणुकीची शनिवारी दुपारी १२ वाजता सांगता झाली. जिल्ह्यातील ४ हजार २४३ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.

मुख्य विसर्जन मिरवणुकीस सकाळी १० च्या सुमारास सुरुवात झाली. मोती चौकात विविध गणेश मंडळे मिरवणुकीमध्ये सामील होत होती. शहरातील मानाचा पहिला गणपती शनिवार चौक येथील जयहिंद व्यायाम मंडळ, सोमवार पेठ येथील मानाचा दुसरा गणपती आझाद हिंद मंडळ, गुरुवार पेठ येथील मानाचा तिसरा गणपती गुरुवार तालीम संघ, बुधवार पेठ येथील मानाचा चौथा गणपती अजिंक्य गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ येथील मानाचा पाचवा गणपती जय जवान मंडळ, सातारचे आराध्य दैवत शनिवार पेठ सातारा येथील शंकर-पार्वती गणपतीची आरती राजवाडा परिसरात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news