Satara lightning strike: कोंडवे येथे वीज पडून 18 बकऱ्या ठार

कण्हेर परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली
Satara lightning strike: कोंडवे येथे वीज पडून 18 बकऱ्या ठार
Published on
Updated on

कण्हेर : कण्हेर परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसावेळी कोंडवे ता. सातारा येथील चोरगेमळा शिवारातील धनगरांच्या बकऱ्यांच्या कळपावर वीज पडली.

यामध्ये हणमंत बापू मासाळ (रा. पळसावडे, ता. माण) या मेंढपाळाच्या 11बकरी व 7 मेंढ्या ठार झाल्या. या मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचा घटनास्थळी सभापती महेश गाडे, तलाठी गणेश बोबडे व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला आहे.

या मेंढपाळास नैसर्गिक आपत्ती या घटनेखाली सुधारित दाराप्रमाणे नुकसान भरपाई लवकरच मदत देण्याचे आश्वासन सभापती यांनी दिले. या अपघातात चार ते पाच शेळ्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने उपचार करण्यात आले. जोरदार अवकाळी पावसामुळे छोटी मोठी झाडे पडून ऊसांची पिके ही काही प्रमाणात भुईसपाट झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news