सातारा: दामदुपटीच्या नावाखाली 14 लाखांची फसवणूक संशयिताला बेड्या

वडूज पोलिसांनी फसवणूकप्रकरणी संशयिताला बेड्या ठोकल्या.
वडूज पोलिसांनी फसवणूकप्रकरणी संशयिताला बेड्या ठोकल्या.
Published on
Updated on

वडूज; पुढारी वृत्तसेवा : स्टॉक मार्केटच्या माध्यमातून 105 दिवसात पैसे दामदुपटीने देण्याचे आमिष दाखवून कोडूमुलाईल जोसेफ अब्राहम (वय 69, रा.बलवंत पार्क वडूज) यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून निरंजन महेश कुलकर्णी (रा.सोमवार पेठ कराड) याला वडूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार अब्राहम हे एका नामांकित टायर कंपनीमधून काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून सध्या ते त्यांच्या मुलीकडे वडूज येथे राहण्यास आहेत. यातील संशयित कुलकर्णी व तक्रारदार यांचे जावई यांची ओळख असल्याने त्याचे त्यांच्याकडे येणे जाणे असायचे. त्या ओळखीच्या माध्यमातून निरंजन कुलकर्णी याने अब्राहम यांचा जावई व मुलीला स्टॉक मार्केटमध्ये काही पैसे गुंतवण्यास भाग पाडले व त्यांना त्यांचा दुप्पट परतावा देखील दिल्याने तक्रारदार यांचा त्याच्यावर विश्वास बसला.

त्यानंतर कुलकर्णी याने तक्रारदार यांनाही स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याची गळ घालून त्यांना 105 दिवसात दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले. अब्राहम यांनी सेवानिवृत्तीनंतर आलेले 14 लाख 6 हजार पाचशे रुपये कुलकर्णी याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे गुंतवले. अब्राहम यांनी कुलकर्णी याला बँक खात्यातून काही रक्कम ट्रान्सफर केली होती तर तीन लाख रुपये रोख स्वरुपात दिले होते.

कुलकर्णी याने दिलेली मुदत संपल्यानंतर अब्राहम यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुलकर्णी यांनी अब्राहम यांना दोन धनादेश दिले होते ते दोन्ही धनादेश कुलकर्णींच्या खात्यावर पैसे नसल्याने परत आल्याने कुलकर्णींकडून आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अब्राहम यांनी वडूज पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली.

पोलिसांनी घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन तातडीने कुलकर्णीला बेड्या ठोकल्या.अब्राहम यांच्यासारखी अनेक लोकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणांमध्ये आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

नागरिकांनी पोलिसात संपर्क साधावा

कुलकर्णी व अन्य लोकांच्याकडून अब्राहम यांच्यासारखी फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तातडीने पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि मालोजीराव देशमुख यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news