Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala : माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आज पहिले रिंगण

चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण : माऊली आज तरडगाव मुक्कामी
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील आज पहिले रिंगण
Published on
Updated on

नवनाथ गोवेकर

तरडगाव : आळंदी - पंढरपूर वारीतील विशेष महत्व असलेला रिंगण सोहळा वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणित करणार क्षण असतो. वारकऱ्यांना पुढील वारीसाठी एक नवी ऊर्जा देणारा रिंगण सोहळा आज फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब (तरडगाव) येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. आज (दि. १६) लोणंद येथील दिड दिवसाचा मुक्काम आटपून दुपारी एकच्या सुमारास पालखी सोहळा तरडगावच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता चांदोबाचा लिंब याठिकाणी पालखी सोहळ्यातील पाहिले उभे रिंगण पार पडणार आहे. सर्वांना आतुरता लागून राहिलेला हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णव उपस्थित असणार आहेत.

संत श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज दि. १६ रोजी तरडगाव मुक्कामी येत आहेत. कालपासून भजन, टाळ, मृदुंगाने परिसर भक्तीमय झाला आहे. संप्रदाय गाव म्हणून ओळख असलेल्या तरडगाव येथे आज सायंकाळी ५ वाजता पालखी सोहळा मुक्कामी येत असून तरडगावकर स्वागतासाठी आतुर झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्यावतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून वारकऱ्यांच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. फलटण तालुका प्रशासनाच्यावतीने माऊलींच्या पालखीचे दुपारी फलटण तालुक्यात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. दुपारच्या जेवणानंतर एकच्या सुमारास पालखी खंडाळा तालुक्याचा निरोप घेऊन सरहदेचा ओढा ओलांडून फलटण तालुक्यात प्रवेश करणार आहे. फलटण तालुक्याच्यावतीने पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आ. रामराजे नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी अक्षय घावटे, संदीप कळसाईत, ग्रामपंचायत तरडगाव, कापडगावचे सरपंच, उपसरपंच व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पालखी सोहळा सायंकाळी पाच वाजता तरडगाव येथे पोहचणार असून एकच मुक्काम असल्याने शेजारील तालुक्यातून भाविक दर्शनासाठी येत असल्याने गर्दीचे प्रमाण जास्त होते. माऊलींचा मुक्काम असणाऱ्या तरडगाव पालखी तळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. माऊलींचा तरडगाव मधील सोहळा उद्या (शुक्रवार) सकाळी सहाच्या सुमारास फलटणकडे प्रस्थान करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news