Sajjangad incident: सज्जनगडावरून उडी घेऊन जीवन संपवले

सज्जनगड येथे एका हॉटेल कामगाराने सुमारे 200 फूट उंच कड्यावरून दरीत उडी घेऊन जीवन संपवले
Ended life
Ended lifePudhari Photo
Published on
Updated on

परळी : सज्जनगड येथे एका हॉटेल कामगाराने सुमारे 200 फूट उंच कड्यावरून दरीत उडी घेऊन जीवन संपवले. संदेश शंकर पडियार (वय 34, रा. माची पेठ, सातारा) असे या मृत कामगाराचे नाव आहे.

संदेश पडियार हे सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते एकटेच सज्जनगडावर आले. गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धाब्याचा मारुती मंदिराच्या दक्षिणेकडील कड्याकडे ते गेले होते. यावेळी त्यांनी खोल दरीत उडी घेतली. ही घटना परिसरातील पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सातारा तालुका पोलिस स्टेशन येथे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. स्थानिकांच्या मदतीने सुमारे 200 फूट खोल दरीत उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात आले. मात्र, उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी पोलिस हवालदार कर्णे, एएसआय वायदंडे तसेच होमगार्ड पलटण नायक शिंदे, सावंत व चव्हाण यांनी मिळून संबंधित व्यक्तीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. दरम्यान, कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश पडियार हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news