

परळी : किल्ले सज्जनगड भाविकांनी बहरला आहे. सज्जनगड फाटा ते सज्जनगड बस स्थानक रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून भक्त व भाविकांची पायपीट झाली.
किल्ले सज्जनगडावर विकेंडमुळे भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांबरोबरच ठोसेघर, चाळकेवाडी, कासवर येणारे पर्यटकही सज्जनगडावर हमखास दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे रविवारी सज्जनगड भाविकांनी हाऊसफुल झाला. अरुंद रस्ता, दुतर्फा लागलेली वाहने तसेच बस स्थानकात असलेली अपुरी जागा यामुळे भाविकांची गैरसोय झाली.
वाहतूक पोलिस आड रस्त्याला उभे
सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी रस्त्यावर वाहतूक पोलिस हातात मोबाईल घेऊन पावती फाडणे किंवा कागदपत्रे तपासून दंड देणे यात मग्न होते. परजिल्ह्यातून येणार्या वाहनांवर कारवाई करण्यात ते मश्गुल होते. मात्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा त्यांच्या ध्यानीमनी नसल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला.