Vaishnavi Hagwane Case | हगवणे प्रकरणात कडक कारवाई : रूपाली चाकणकर

Vaishnavi Hagwane Case | हगवणे प्रकरणात कडक कारवाई : रूपाली चाकणकर
image of Rupali Chakankar
Vaishnavi Hagwane Casepudhari
Published on
Updated on

Rupali Chakankar on Vaishnavi Hagwane Case

सातारा - वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या विकृतीला कंटाळून जीवन संपवले, ही अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे. ही घटना समजताच मी या प्रकरणांमध्ये सुमोटो दाखल केला आहे आणि बावधन पोलीस स्टेशनला याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. या विकृतीच्या विरोधात सर्वांना लढायचं आहे, अशी देखील प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली. आज महिला राज्य आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि खासदार सुनील तटकरे सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

वैष्णवी मृत्यू प्रकरण निंदनीय, नराधमवर कारवाई झालीच पाहिजे : खासदार सुनील तटकरे

वैष्णवी प्रकरणात संबंधितांवर कारवाई व्हावी, असे पक्षाच्या वतीने आमचे मत आहे.वैष्णवी मृत्यू प्रकरण हे निंदनीय कृत्य आहे. संबंधित नराधमवर कारवाई झालीच पाहिजे. कितीही जवळचे असले तरी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

image of Rupali Chakankar
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने जीवन संपवले

त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये स्वागतावेळी पालकमंत्री पदाचे बॅनर लागले आहेत. छगन भुजबळ यांचे पालकमंत्री पदाचे बॅनर लावले जरी असले तरी याविषयी निर्णय वरिष्ठ तीन नेते घेतील, असे तटकरे म्हणाले.

image of Rupali Chakankar
Vaishnavi Hagawane Death | वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर फरार असलेल्या राजेंद्र हगवणेंवर राष्ट्रवादीची मोठी कारवाई, पक्षातून हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र सुनेच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आल्याने सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आलीय. पण राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे अद्याप फरार आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news