Satara lightning strike: वीज पडून मेंढपाळ ठार; वळवाचा दणका

नागठाणे येथे परतीच्या प्रवासापूर्वीच मेंढपाळावर घाला
Satara lightning strike: वीज पडून मेंढपाळ ठार; वळवाचा दणका
Published on
Updated on

नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) येथे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील आपल्या मूळगावी परतीच्या प्रवासाला जाण्याच्या बेतात असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. पाऊस फारसा कोसळला नसला तरी विजांच्या थरथराटाने अवघा परिसर भेदरुन गेला.

तुकाराम सिधु होनमाने (वय 65, मूळ रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर, सध्या रा. नागठाणे) असे मृत मेंढपाळाचे नाव आहे. नागठाणे, अतीत हद्दीवरील शिव नावाच्या शिवारात तुकाराम होनमाने हे आपल्या मेंढ्यांच्यासाठी भुईमूगचे वेल गोळा करत होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. यावेळी ते शेतातील झाडाजवळ थांबले होते. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात ते जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती मिळताच नागठाणेचे मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच बोरगाव पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तुकाराम होनमाने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news