सातारा : फेसबुकच्या ओळखीतून दोघांकडून बलात्कार

सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
rape case involving facebook acquaintance
फेसबुकच्या ओळखीतून दोघांकडून बलात्कार.File Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : विवाहितेची फेसबुकवर ओळख झाल्यानंतर दोघांनी एका महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. ही घटना 2019 पासून घडली असून सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेत अशोक पिसाळ (रा. गोडोली, सातारा) व हर्षल भास्करराव चव्हाण (मूळ रा. नांदगाव ता.सातारा सध्या रा. स्वराजनगर, गोडोली) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिसेंबर 2019 मध्ये अनिकेत पिसाळ याने पीडित महिलेशी फेसबुकवरून ओळख वाढवली. व तिचा मोबाईल नंतर घेतला. यातूनच संपर्कात आल्यावर अनिकेत महिलेच्या घरी गेला आणि घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर त्याने ‘महिन्यातून एकदा भेटायचे नाहीतर शारिरीक संबंधाविषयी तुझ्या पतीला सांगेन,’ अशी धमकी दिली. यामुळे महिला घाबरली व तिने कोणाला याबाबतची माहिती सांगितली नाही.

दरम्यान, या घटनेनंतर फेसबुकवरुनच हर्षल चव्हाण याच्याशी ओळख झाल्यानंतर त्यानेही या महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्याने अनिकेत पिसाळ याच्याबाबतची घटना विचारली आणि ‘त्या प्रकरणातून बाहेर काढतो’, असे सांगून महिलेशी जवळीक वाढवली. यातूनच त्याने धमकी देत महिलेवर हॉटेल प्राईड येथे बलात्कार केला. अनिकेत पिसाळ याला ही बाब समजल्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर या घटनेची माहिती पतीला दिली. त्यावरुन त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जावून दोघांविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news