फलटणमध्ये आज रणजितसिंह ना. निंबाळकर यांचे शक्ती प्रदर्शन

भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांची माहिती
Ranjitsinh Nimbalkar
Published on
Updated on

फलटण : लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर भव्य शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, बजरंग गावडे यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपा विचाराच्या उमेदवारास निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव मतदार संघात त्यांना मिळालेल 18 हजारांचे मताधिक्य व राजे गटातील काही बिन्नीच्या शिलेदारांनी पक्षांतर केले आहे. यामुळे रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी चांगलीच उभारी घेतली आहे. तसेच त्यांनी रेल्वे, रस्ते, शेतीपाणी योजना, विविध कार्यालये व नाईकबोंबवाडी एमआयडीसीच्या माध्यमातून फलटण कोरेगाव मतदार संघात विकास पर्व उभे करण्याचा प्रयत्न करुन तालुक्यातील सत्ताधारी गटापुढे आव्हान उभे केले आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते व त्यांचे कार्यकर्ते कार्यमग्न झाले आहेत. फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे शुक्रवारी सकाळी 10 वा. होणार्‍या लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून रणजितसिंह ना. निंबाळकर शक्ती प्रदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी फलटण कोरेगाव मतदार संघातून सुमारे 25 हजार लाडक्या बहिणी व पुरुष मतदारांची उपस्थिती ठेवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या मेळाव्यास फलटण कोरेगाव मतदार संघातील भाजप मित्र पक्षांचे प्रमुख नेतेमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. लाडक्या बहिणींनी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news