Cannabis Cultivation: रामोशीवाडीत गांजाची अवैध लागवड

पावणेतीन लाखांचा गांजा जप्त; एलसीबी व पुसेगाव पोलिसांची कारवाई
Cannabis Cultivation |
Cannabis Cultivation: रामोशीवाडीत गांजाची अवैध लागवडPudhari Photo
Published on
Updated on

खटाव : रामोशीवाडी (ता. खटाव) येथे शेतकऱ्याने चक्क गांजाची लागवड केल्याचे समोर आले आहे. सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पुसेगाव पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत कारवाई करून सुमारे पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे. सचिन बापू मदने (वय 35, रा. रामोशीवाडी, पो. जाखणगाव, ता. खटाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रामोशीवाडी (जाखणगाव) येथील सचिन मदने याच्या राहत्या घराच्या आजुबाजूच्या शेतात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध गांजाची शेती केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 11.156 किलोग्रॅम वजनाची हिरवट पाने, फुले, बारीक काड्या, बीज व ओलसर पाने, खोड व मुळे असलेली 9 लहान-मोठ्या आकाराची गांजाची झाडे जप्त केली. त्यांची किंमत सुमारे 2 लाख 78 हजार 900 रुपये इतकी आहे. या प्रकरणी सचिन बापू मदने याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्टप्रमाणे पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कोरेगाव राजश्री तेरणी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण, पोलिस उपनिरीक्षक पारितोष दातीर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगाव पोलिस ठाणे पथकातील पोलिस अंमलदारांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news