रक्षक प्रतिष्ठान देणार तरूणाईच्या करिअरला दिशा

सुशीलदादा मोझर यांचा पुढाकार : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी उपक्रम ठरणार आयडॉल
Rakshak Foundation will give career direction to the youth
रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीत सुशील मोझर यांनी प्रतिष्ठानची नवी दिशा स्पष्ट केली. यावेळी प्रतिष्ठानचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Pudhari photo
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : रक्षक प्रतिष्ठान हे जिल्ह्यातील गावोगावी, वाड्यावस्त्यांवर पोहचले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठानने नवा मोड घेतला असून या प्रतिष्ठानने आता तरूणाईच्या करिअरला दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेतले आहे. त्यासाठी रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुशिल मोझर यांनी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या प्रतिष्ठानच्या बैठकीत बेराजगार युवकांसाठी आयडॉल काम उभे करण्याचा निर्धार करण्यात आला.

सातारा जिल्ह्यातील रक्षक प्रतिष्ठानच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक प्रीती हॉटेल येथे संपन्न झाली. यावेळी सुशील मोझर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोझर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, रक्षक प्रतिष्ठान यापुढे सामाजिक उपक्रमास सुरुवात करणार आहे. कोणताही राजकीय रंग न घेता यापुढे जिल्ह्यात सामाजिक काम केले जाणार आहे. बेरोजगारी वाढत चालल्याने आता रोजगारावर जास्त फोकस केले असून देशात किंवा परदेशात शिक्षणाच्या दर्जानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Rakshak Foundation will give career direction to the youth
सातारा : राजवाड्यालगतचे 23 हातगाडे हटवले

सुशिल मोझर म्हणाले, जिल्ह्याच्या युवकांसाठी परदेशात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रतिष्ठान काम करणार आहे. संगणकाचे महत्व लक्षात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मोफत संगणक कोर्स तसेच शेतकरी कामगार महिलांच्या प्रश्नांच्या हक्कासाठी प्रतिष्ठान राजकारण विरहित आक्रमकपणे कार्यरत राहील आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी होण्याकरता तालुकास्तरीय कमिटी स्थापन करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मनोज माळी, सुभाष चौधरी, मिलिंद कदम, सुजित पवार, राजेंद्र कोळपे, सुनील जाधव, आप्पा कदम, अविनाश कोळपे, तन्वीर शेख, अमीर मुजावर, शिवाजी चव्हाण, विकास तुपे, नाना महाडिक, सुशील गायकवाड, अक्षय चव्हाण, मंगेश चव्हाण, नूर पटेल, दस्तगीर बागवान, सचिन पिसाळ, दत्ता ढमाळ, मयूर कांबळे, भानुदास डांईगडे, राहुल शेडगे, सुशील जाधव, सनी जाधव, मयूर शिंदे, संतोष कवे, बंडा जाधव, बाबू भिसे, अमीर शेख, सचिन चव्हाण, अमोल चौधरी, विशाल मोझर, हर्षद शेलार, ऋषिकेश चव्हाण, आबा पुजारी, सुधीर माने, सुमित साळुंखे उपस्थित होते.

Rakshak Foundation will give career direction to the youth
सातारा : घाटक्षेत्रात दोन दिवस यलो अलर्ट

प्रत्येक तालुक्यात सेंटर उभे करून मोफत संगणक प्रशिक्षण देणार

सुशिल मोझर म्हणाले, रक्षक प्रतिष्ठान हे जिल्ह्यातील बेरोजगारांना देशात किंवा परदेशात त्यांच्या शिक्षणाच्या दर्जानुसार रोजगार उपलब्ध करून देणार आहे. भारतासह इतर 20-25 देशात माझा संपर्क असून सातारा जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील तरुणांना प्राधान्य देणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक सेंटर स्थापन करून गरजूंना परदेशात नोकरीसाठी लागणारे कॉम्प्युटरचे ज्ञान मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news