

सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे व सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र असलेल्या दै. ‘पुढारी’च्या 86 व्या वर्धापनदिन स्नेहमेळाव्याला स्नेहीजणांचा अलोट जनसागर लोटला. रेकॉर्डब्रेक गर्दीने यंदाही ‘पुढारी’चे ‘पुढारपण’ पुन्हा सिद्ध केले. हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर संगीत सुरांच्या सुरेल मैफलीत राजकारणाच्या रहाटगाडग्यातून निवांत क्षणांची अपेक्षा करणार्या राजकारण्यांनाही विरंगुळा मिळाला. मान्यवरांसह वाचक, विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतक यांनी उशिरापर्यंत थांबून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. विक्रमी विशेषांक प्रकाशित केलेल्या ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात यावर्षी सातारा जिल्हावासियांनी गर्दीचा उच्चांक केला.
‘पुढारी’चा वर्धापनदिन स्नेहमेळावा म्हणजे आनंदाची पर्वणीच. विविध क्षेत्रातील स्नेहीजणांच्या भेटीचा योग जुळवून आणणारा आपल्या हक्काचा सोहळा, या भावनेतून जिल्हाभरातून विविध मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. प्रत्येकजण कार्यक्रमस्थळी येताच ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करत होते. अत्यंत उत्साही व जल्लोषी वातावरणात झालेल्या या गौरव सोहळ्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी झाली. या सर्वांचे दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलींद भेडसगावकर यांच्यासह टीम ‘पुढारी’ने स्वागत करुन वाचकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांची नावे अशी,
अधिकारी : अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सातारा तहसीलदार नागेश गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता (पश्चिम) राहूल अहिरे, उपअभियंता रवीकुमार आंबेकर, प्रशांत खैरमोडे, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे कार्यकारी अभियंता अमर काशिद, अभियंता प्रशांत शेडगे, तलाठी एस. एन. वणवे, मंडलाधिकारी संजय बैलकर, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक, वाई सहाय्यक निबंधक अनिल क्षीरसागर, रेल्वे स्टेशन प्रबंधक राजकुमार साळवे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत चव्हाण, उपाध्यक्ष संदीप सावंत, शरद गायकवाड, सहायक कामगार आयुक्त नितीन कवले, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, महावितरणचे भरत लोखंडे, पुष्पा गायकवाड, अनिता इंगळे व इतर.
राजकीय : आ. शशिकांत शिंदे, रिपाईचे अशोक गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब खंदारे, किशोर शिंदे, धनंजय जांभळे, श्रीकांत आंबेकर, माजी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले, शंकर माळवदे, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम कळसकर, शिवानीताई कळसकर, संजय शिंदे, युवा नेते संग्राम बर्गे, मनीष घोरपडे, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, व्यंकटराव मोरे, बाळासाहेब महामुलकर, राजेश भोसले, नरेंद्र पाटील, अॅड. विनीत पाटील, अमित महिपाल, अमोल पवार, राजकुमार पाटील, शफीक शेख, राहुल शिवनामे, सतीश भोसले, भैय्यासाहेब जाधवराव, भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, प्रवीण शहाणे, विकास धुमाळ, वसंत जोशी, बाळासाहेब महामुलकर, विजय कुंभार, आशुतोष चव्हाण, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के, विशाल कणसे, विक्रम सावंत, विठ्ठल मोरे, प्रशांत निकम, अमोल जगताप, सचिन जाधव, प्रवीण सुळके, राजेंद्र कदम, विजय कदम, सौ. जयश्री गिरी, सातार्याच्या माजी सभापती सौ. सरिता इंदलकर, धर्मराज घोरपडे, उद्योजक अरुण कापसे, तुषार पाटील, यशवंत गायकवाड, दिलीप निंबाळकर, विक्रम पवार, तुकाराम शेलार, दिपक भुजबळ, डॉ. नितीन सावंत, संभाजीराव घाडगे, शिवसेना शिंदे गट सातारा शहराध्यक्ष निलेश मोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन मोहिते, शिवसेना ठाकरे गट सातारा शहराध्यक्षा मंजिरी सावंत, बाजार समिती माजी संचालक श्रीरंग देवरुखे, अभयसिंहराजे भोसले माथाडी कामगार युनियन सरचिटणीस रवी काटकर, अंकुश मोरे, विजय गुजर, विष्णू पिंपळे, भाजप
ओबीसी युवती जिल्हाध्यक्षा
वनिता पवार, श्वेता पवार, काँग्रेस युवकचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, सरचिटणीस नरेश देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे बाळासाहेब शिंदे, गणेश अहिवळे, रामचंद्र जाधव, विद्याधर कांबळे, मारुती निकम, विजय काळोखे, संपत मोरे, मच्छिंद्र खाडे, विपुल मोरे.
सामाजिक : यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, अमर गायकवाड, दिपक पाटील, अॅड. नितीन शिंगटे, मुकुंद आफळे, गौरीशंकरचे नितीन मुडलगीकर, श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे, मंगेश फडतरे, राज मुजावर, रघुनाथ कुंभार, विलास जवळ, उद्धव बाबर, रणजीत कदम, अविनाश पिसाळ, आनंदराव नलवडे, रवी मोरे, महेश कानेटकर, संजय कुलकर्णी, विलास शिंदे, राजेंद्र शिंदे, अरुण राजे, किरण गायकवाड, प्रदिप वाघ, प्रशांत निकम, सागर शिंदे, भास्कर शिंदे, प्रशांत बागल, सचिन पाटील, विनायक बनकर, गणेश माळी, नितीन पाटील, मानसिंगराव शिंगटे, संजय शिंगटे, उमेश शिंगटे, राजेंद्र जाधव, उमेश कुलकर्णी, घनश्याम शिंगटे, प्रविण शिंगटे, महेश रोकडे, प्रवीण माने, अजिंक्यतारा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन गुरव, डॉ. प्रसन्न बाबर, कर्तव्य सखी मंच अध्यक्षा अश्विनी शेळके, एसएस मोबाईलचे सुशील बकरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रफिक शेख, मासचे माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार मोहिते.
लेक लाडकी अभियानाच्या अॅड. वर्षा देशपांडे, अॅड. शैलजा जाधव, अॅड. चैत्रा व्ही. एस., अॅड. वनराज पवार, स्वाती बल्लाळ, प्रा. विनोद कदम, संयोगिता माजगावकर, अंनिसचे प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, वैशाली माने, परिवर्तन व्यसनमुक्तीचे डॉ. हमीद दाभोळकर, प्रा. निरंजन फरांदे, तृप्ती बोराटे, सुनिता मेनकर, अरुणा राजेमहाडिक, प्रिया शिंदे, साधना साखरे, डॉ. चंद्रकांत नलवडे, नाथाजी बाबर.
जिल्हा परिषद : अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, अभियंता माधव पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, वेतन अधिक्षक सुनील शिखरे, हेमंतकुमार खाडे, लेखाधिकारी संदीप निंबाळकर, समाधान चव्हाण, डॉ. संतोष विरकर, दिग्वीजय पाटील, वैभव कदम, विशाल कुमठेकर, गुफ्राना पटेल, विकास माने, मोहन महाडिक, काका पाटील, प्रशांत तुपे, सुनील चतुर, महेशकुमार खामकर, दिनेश दाभाडे, विठ्ठल शिंदे, संदीप दिक्षीत, राजेंद्र पाटील, नितीन दिक्षीत, दिनकर चव्हाण, अमोल पवार, इंद्रजीत शेलार, जितेंद्र देसाई, वैभव घाटगे, सुनील कापसे, अशोक पाटणे, कमलाकर वाघ, आप्पा शिंदे, मारुती जाधव, संजय गाढवे, महेंद्र सणगर, संजय सोनावणे, कमलाकर वाघ, संदीप सावंत, संजय जाधव, अवधूत वेल्हाळ, नटराज पाटील, अभिजित पाटील, महेश गुरव, विनोद ननावरे, संजय जाधव, राहूल मुरे, सचिन खरोडे, नवनाथ दळे, शिवाजी सोनावणे, सागर निकम, राजेंद्र जाधव, संकेत शेडगे, नंदकुमार भोसले, जालिंदंर मस्के, मनोज पवार, रविंद्र कुलकर्णी, अरूण गुरव, धनाजी पाटील, अजय राऊत, गणेश चव्हाण, राजेश भोसले, राजेश इंगळे, ऋषिकेश शिलवंत, निलिमा सुरमुख, शकील मुजावर, अफसाना मुजावर, साकेत महामुलकर, अंकुश मोटे, अजित पवार, सागर भुतांबरे, उत्तम गावीत, शशिकांत चव्हाण, रामचंद्र बंदसोडे, सचिन शिंदे, माधव गंगावणे, सुरेश वायदंडे, संतोष कापसे, गोपीचंद पवार, प्रविण पवार, अविनाश पवार, वैभव फडतरे, विजय देवकर.
पोलिस : सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस, एलसीबीचे पोनि अरुण देवकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, निलेश तांबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव, फौजदार तानाजी माने, पोलिस कांतीलाल नवघणे, संदीप इंगवले, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, सुहास पवार, रमेश शिखरे, धोंडिराम हंकारे, निलेश काटकर, चेतन शहाणे उपस्थित होते.