

सातारा : 'पुढारी’ वर्धापनदिन स्नेहमेळाव्याला यंदा रेकॉर्डब्रेक गर्दी उसळली. हॉटेल लेक व्ह्यूच्या संस्कृती लॉनवर झालेल्या स्नेहमेळाव्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, विक्रेते, जाहिरातदार व हितचिंतकांनी आपुलकीची भावना व्यक्त केली. जिल्हावासीयांनी ‘पुढारी’ला भरभरुन शुभेच्छा देताना ‘पुढारी’शी असलेले ऋणानुबंध आणखी घट्ट केले.
‘पुढारी’चा वर्धापनदिन स्नेहमेळावा म्हणजे आनंदाची पर्वणीच. विविध क्षेत्रातील स्नेहीजणांच्या भेटीचा योग जुळवून आणणारा आपल्या हक्काचा सोहळा या भावनेतून जिल्हाभरातून विविध मान्यवरांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करुन साऱ्यांनीच त्यांना अभिवादन केलेे. अत्यंत उत्साही व जल्लोषी वातावरणात झालेल्या या गौरव सोहळ्यात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, साहित्य, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी झाली. या सर्वांचे दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, निवासी संपादक हरीश पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलींद भेडसगावकर यांच्यासह टीम ‘पुढारी’ने स्वागत केले.
स्नेहमेळाव्याला विविध स्तरातील लोकांनी उपस्थित राहून ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पूर्व) श्रीपाद जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पश्चिम) कार्यकारी अभियंता राहूल अहिरे, आकाश पाटील, रवींद्र आंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुधाकर भोसले व नागेश गायकवाड, सातारा प्रांताधिकारी आशिष बारकूल, सातारा तहसीलदार समीर यादव, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, महावितरण कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के, सहायक कामगार आयुक्त नितीन कवले, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, नगरसेवक अविनाश कदम, सूर्यकांत ऊर्फ राजू गोरे, ॲड. डी. जी. बनकर, सुशांत महाजन, विजय देसाई, सागर पावसे, फिरोज पठाण, नगरसेविका मुक्ता लेवे, भारती सोळंकी, शारदा वाघमोडे, आशा पंडित, पूनम निकम, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, किशोर शिंदे व शंकर माळवदे, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, कल्याण राक्षे, सुवर्णा पाटील, शिवानी कळसकर, प्रीतम कळसकर, मनोज सोळंकी, पप्पू कांबळे, प्रतीक भद्रे, इर्शाद बागवान, ॲड. विनीत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, राहूल पवार,गौरीशंकर नॉलेज सिटीचे मिलिंद जगताप, प्राचार्य नितीन मुडलगीकर, प्राचार्य विजय राजे, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर,पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, निलेश तांबे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक बाबासाहेब भूतकर, पोलिस निरीक्षक माधव चव्हाण, फौजदार जितेंद्र देसाई, पोलिस धोंडीराम हंकारे, बालम मुल्ला, मनोज गायकवाड, संदीप पांडव,वाचक सुशांत बाबर, रामदास ढाणे, नीलिमा कदम, किरण कदम, राजेंद्र राजपूरे, किरण दुधाणे, अनिल जगताप, तृप्तेश लांजेकर, गौरव मिस्त्री, प्रवीण जाधव, जितेंद्र पिसाळ, भूषण चव्हाण, तेजस्विनी भिलारे, जतीन भिलारे, महाबळेश्वर नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, नगरसेवक शेखर कासुर्डे, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, नगरसेविका अभिलाषा कऱ्हाडकर, ॲड. संजय जंगम, रोहित ढेबे, अफझल सुतार,श्रीरंग देवरुखे, विजय गुजर, अजय काशीद, शशिकांत वाईकर, रवी काटकर, सुनील वाईकर, विष्णू पिंपळे, बाबूराव सकटे, सूर्यकांत लोटेकर, बबन लोटेकर, सुनील कुंभार, नानासाहेब सोनवलकर, अशोक फाळके, राष्ट्रवादी युवकच्या राज्य संघटक स्मिता देशमुख, अश्विनी हुबळीकर, गौरी गुरव, रीना भणगे, वनिता पवार, मनीषा साळुंखे, कमलाकर वाघ यांनी ‘पुढारी’ परिवाराला शुभेच्छा दिल्या.