Pudhari Edu Disha: साताऱ्यात 5 जूनपासून ‌‘पुढारी एज्यु दिशा‌’

सलग तीन दिवस शैक्षणिक प्रदर्शनाची मेजवानी : विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त करिअर मार्गदर्शन
Pudhari Edu Disha
Pudhari Edu Disha
Published on
Updated on

सातारा : दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांचे डोळे पुढील प्रवेश प्रक्रियेकडे आणि करिअरच्या विविध पर्यायांकडे लागले आहेत. अशा महत्त्वपूर्ण टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी दैनिक ‌‘पुढारी‌’चे लोकप्रिय आणि बहुप्रतीक्षित एज्युदिशा 2026 शैक्षणिक प्रदर्शन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

यावर्षी हे प्रदर्शन साताऱ्यातील पोलिस करमणूक केंद्रात अलंकार हॉलमध्ये शुक्रवार दि. 5, 6 व 7 जून रोजी संपन्न होत आहे. नामवंत शैक्षणिक संस्थांचे स्टॉल बुकिंग झाले असून विद्यार्थी व पालकांना या प्रदर्शनाची उत्सुकता लागून राहिली आहे.

एकाच छताखाली करिअरचे अगणित पर्याय पारंपारिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणारे अनेक पर्याय या प्रदर्शनात एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी यासोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा एआय, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ॲग्रो-टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.

यावर्षी विशेषतः न्यू एज स्किल्स आणि ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज (परदेशातील शिक्षणाच्या संधी) या घटकांवर अधिक भर दिला जाणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार

दै. ‌‘पुढारी‌’ आयोजित एज्युदिशामध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

पात्रता : 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.

काय करावे?: विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेज चे नाव आणि मार्कलिस्ट 9172840739 या व्हॉटस्‌‍ॲप क्रमांकावर पाठवावी.

अधिक माहितीसाठी : विद्यार्थी व पालकांनी 8805007671 या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news