

सातारा : ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आता करिअर संधीचा खजिना आजपासून खुला होत आहे. दि. ५, ६ व ७ जून या कालावधीत साताऱ्यातील पोलिस करमणूक केंद्रात होत असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आज शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक क्षेत्रातील करिअरच्यादृष्टीने बहुविध माहिती, तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटांचा नवीन खजिना उपलब्ध होणार आहे.
दहावी, बारावी या महत्वाच्या परीक्षांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर पुढे काय करायचे? याबद्दल अभ्यासक्रमांची रेलचेल सध्या समोर दिसते. पालक आणि विद्यार्थी याबाबत संभ्रमावस्थेत असतात. मात्र, या अभ्यासक्रमांची सर्वंकष माहिती तसेच नेमके आणि अचूक करिअर निवडीचे मार्गदर्शन आता सहजपणे येथे उपलब्ध होणार आहे. अनेक शैक्षणिक संस्थांचे स्टॉलही असणार आहेत. येथे विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती उपलब्ध असेल.
दैनिक ‘पुढारी’च्या ‘एज्यु दिशा’ करिअर प्रदर्शनाला दरवर्षी विद्यार्थी व पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आला आहे. त्याच धर्तीवर आता आजपासून ‘पुढारी एज्यु दिशा’ प्रदर्शन सुरू होत आहे. येथील पोलिस करमणूक केंद्रात सकाळी 11 वाजता जिल्हा पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा थाटात शुभारंभ होणार आहे.
यावेळी दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव, दै. ‘पुढारी’चे सातारा विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, दै.‘पुढारी’चे निवासी संपादक हरीश पाटणे, मार्केटिंग मॅनेजर मिलिंद भेडसगावकर, संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणेचे स्कूल ऑफ फार्मसीचे प्रा. जयेश बलदोटा, एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सोलापूरचे ॲडमिशन आणि आउटरीज प्रमुख अनुप सिंग, चाटे शिक्षण समुह साताराचे जिल्हा प्रमुख राजेंद्र घुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
एकाच छताखाली करिअरचे अगणित पर्याय पारंपारिक कोर्सेसच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेणारे अनेक पर्याय या प्रदर्शनात एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स, फार्मसी यासोबतच आजच्या काळातील अत्यंत गतिमान अशा एआय, डेटा सायन्स, रोबोटिक्स, ॲग्रो-टेक, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, रिसर्च आणि डिझाईन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील करिअरच्या सुवर्णसंधींची माहिती थेट तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. यावर्षी विशेषतः न्यू एज स्किल्स आणि ग्लोबल स्टडी अपॉर्च्युनिटीज (परदेशातील शिक्षणाच्या संधी) या घटकांवर अधिक भर दिला जाणार आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दै. ‘पुढारी’ आयोजित एज्युदिशामध्ये इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
पात्रता : 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी.
काय करावे?: विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, शाळा/कॉलेज चे नाव आणि मार्कलिस्ट 9172840739 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर पाठवावे.
अधिक माहितीसाठी : विद्यार्थी व पालकांनी 8805007671 या क्रमांकावर संपर्क साधावा.