‘पुढारी’च्या ‘छावा’ विशेषांकाचे खणखणीत स्वागत

Chhava edition : रेकॉर्ड ब्रेक पुरवणीचे जलमंदिरात शानदार प्रकाशन; उदयनराजेही गेले भारावून
Pudhari Chhava special edition
वाढदिवसानिमित्त जलमंदिरात ‘पुढारी’च्या वतीने खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना शुभेच्छा देताना जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, मिलिंद भेडसगावकर व टीम पुढारी पहिल्या छायाचित्रात दिसत असून दुसर्‍या छायाचित्रात माध्यमांच्या क्षेत्रात विक्रमी ठरलेल्या ‘छावा’ या जम्बो या विशेषांकाचे प्रकाशन करताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, मिलिंद भेडसगावकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, अ‍ॅड. अजय मोहिते, प्रीतम कळसकर, संदीप शिंदे व टीम ‘पुढारी’. pudhari photo
Published on
Updated on

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या ‘छावा’ या जम्बो विशेष पुरवणीचे जिल्ह्यात सर्वत्र खणखणीत स्वागत करण्यात आले. माध्यमांसह जनमानसात जोरदार चर्चा झालेल्या या रेकॉर्ड ब्रेक विशेषांकाचे जलमंदिर पॅलेस येथे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन करण्यात आले. उदयनराजेंच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन घडवणार्‍या विशेषांकामधील सेंटर पेजच्या वेगळ्या प्रयोगाचेही सर्वत्र कौतुक झाले.

खा. उदयनराजे यांचा वाढदिवस म्हणजे राजधानी सातार्‍यासह जिल्हाभर एक कौतुक सोहळाच असतो. चाहत्यांसाठी या वाढदिवसाला उत्सवाचे स्वरुप आलेले असते. या वाढदिवसाच्यानिमित्ताने दै. ‘पुढारी’ने ‘छावा’ हा जम्बो विशेषांक प्रसिद्ध केला. या खणखणीत विशेषांक पुरवणीचे जलमंदिर पॅलेस येथे शानदार प्रकाशन झाले. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, दै. ‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर, जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, पंकज चव्हाण, अ‍ॅड. अजय मोहिते, अ‍ॅड. विनीत पाटील, कुलदीप क्षीरसागर, धनंजय पाटील यांच्यासह टीम ‘पुढारी’ व उदयनराजेप्रेमी यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी ‘पुढारी’ विशेषांकातील प्रत्येक पानाचे अत्यंत बारकाईने अवलोकन केले. विशेषत: सेंटर पेजवरील ‘छावा’ या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचे कौतुक केले. ‘व्वा... क्या छावा है’, हे फक्त ‘पुढारी’नेच करू जाणे’, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ‘पुढारी’त चाहत्यांनी व्यक्त केलेल्या उदयनराजे यांच्यावरील प्रेमाच्या वर्षावाने राजेंचे मन भरुन आले. चाहते व ‘पुढारी’च्या प्रेमाची ही शिदोरी कायम सोबत रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या विशेषांकात प्रसिद्ध केलेल्या सेंटर पेजच्या हटके स्टाईलला राजेंनी मनापासून दाद दिली.

खा. उदयनराजेंचा महाराष्ट्रभर जलवा असला तरी केवळ राजकीय नेते एवढीच त्यांची ओळख नसून हटके स्वभाव व स्टाईलमुळे ते नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. खा. उदयनराजे यांच्या विविध पैलूंचे अवघ्या जनमानसाला आकर्षण असते. उदयनराजेंच्या व्यक्तिमत्त्वातील सारे पैलू व चर्चेतील घडामोडी ‘पुढारी’च्या ‘छावा’ या विशेषांकात सेंटर पेजवर प्रसिद्ध करण्यात आल्या. तब्बल 24 पानी जाहिरात पुरवणी असलेला हा विशेषांक ‘पुढारी’चे माध्यमांमधील ‘पुढारपण’पुन्हा सिद्ध करून गेल्याच्या प्रतिक्रिया खा. उदयनराजेंच्या चाहत्यांनी व्यक्त केल्या. राजधानी सातार्‍यासह संपूर्ण जिल्ह्यातील उदयनराजेंच्या चाहत्यांनी व वाचकांनी या विशेषांकाचे कौतुक केले. अनेक स्टॉलवर ‘पुढारी’ पेपर घेण्यासाठी वाचकांनी गर्दी केली होती.

मास्टर प्लॅनर काका धुमाळ...

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांचे नियोजन अनेकजण करत असतात. मात्र या नियोजनाचे परफेक्शन कोणतीही निवडणूक नसताना यावर्षी दिसले. काका धुमाळ यांच्यासारख्या ‘मास्टर प्लॅनर’ उदयनराजेंच्या टीममध्ये असल्याने उदयनराजेंचा वाढदिवस जल्लोषी ठरला. वेगवेगळ्या स्वतंत्र टीम वाढदिवसाचे नियोजन करत असताना या सर्व टीमला एकत्र सांधण्याचे काम काका धुमाळ यांनी चपखलपणे केले. वाढदिवसाच्या नियोजनाच्या तयारीत काका धुमाळ यांचे कष्ट उठून दिसले.

‘पुढारी’ला तोड नाही : खा. उदयनराजे

‘पुढारी’ने कायमच मला सोबत केली आहे. दरवेळेला माझ्या वाढदिवसाच्यानिमित्ताने ‘पुढारी’ वेगळे काही प्रयोग करत असतो. केवळ जाहिराती वगैरे अनेकजण करत असतात. पण ‘पुढारी’ जीव ओतून वेगळे प्रयोग करत असतो. ‘छावा’ ही तर ‘पुढारी’ची आगळी वेगळी कलाकृती आहे. सातारा जिल्ह्यात ‘पुढारी’ नंबर वन का आहे त्याचे हे जबरदस्त उदाहरण आहे. ‘पुढारी’ परिवाराने असेच प्रेम करत रहावे. तुमचे आमचे मैत्रीचे नाते वृद्धींगत करू. ‘पुढारी’ला कालही तोड नव्हती उद्याही नसेल. विशेषांक प्रसिद्ध करण्याची ‘पुढारी’ची स्टाईल ही ‘स्टाईल इज स्टाईल’ आहे, अशा शब्दात उदयनराजेंनी विशेषांकाचे कौतुक केले. यावेळी जलमंदिरात प्रथमच ‘पुढारी’च्या संपूर्ण टीमचे उदयनराजेंनी कौतुकाने स्वागत केले.

दमयंतीराजेंकडून आवर्जून ‘पुढारी’चे कौतुक

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या पत्नी श्री. छ. सौ. दमयंतीराजे यांनी ‘पुढारी’च्या छावा विशेषांकाचे आवर्जून कौतुक केले. त्यांनी विशेषांकाचे अवलोकन करून टीम ‘पुढारी’चे आगळ्या वेगळ्या प्रयोगाबद्दल कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news